पुणे शहरात म्हाडाच्या पाच हजार घरांची सोडत निघणार; म्हाडाच्या १० हजार घरांसाठी ऑक्टोबरमध्ये लॉटरी

मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु अशा शहरांमध्ये घर घेणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही. कारण या शहरांचा झालेला झपाट्याने विकास आणि त्या दृष्टिकोनातून वाढलेल्या जागेच्या आणि घराच्या किमती पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. परंतु आपण म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांचा विचार केला तर यांच्या माध्यमातून उत्तम दर्जांचे घरे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतात.

पुणे शहरात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. यामुळे पुणे शहरातील घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. मागणी जास्त असल्यामुळे घराचे दर वाढलेले असतात. परंतु आता पुणे शहरात घर कमी किंमतीत घेण्याची संधी मिळणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ही संधी मिळणार आहे. म्हाडाकडून पाच हजार घराची सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नुकतीच ४,०८२ घरांची लॉटरी काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मंडळाची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे म्हटले होते.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांची किंमत थोडीफार कमी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे नव्याने सोडत काढण्यात येणाऱ्या घरांचे दर कमी असणार का, हे पाहावे लागेल. २५ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० हजार घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक ५००० घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही घरे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कोकण मंडळानेही चार हजार घरांच्या सोडतीच्या जाहिरातीच्या कामाला वेग दिला आहे.

या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली आहे.