शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डीतील काकडी गावात आले आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम होत असल्याचं सांगितले. त्याचबरोबर यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी सुरू आहे. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल,अजून देखल त्याची दहशत आहे. 2019 साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी सुरू आहे. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल,अजून देखल त्याची दहशत आहे. 2019 साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. वर्षांचे 365 दिवस हे सरकार जनतेच्या दारी जात राहणार आहे. हे लोकांपर्यंत जाणारं सरकार आहे. कारण हे बंद दाराआड काम करणारं सरकार नाही तर हे फेस टू फेस बोलणारं सरकार आहे. हे फेसबुकवर बोलणारं सरकार नाही, असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांना ठाकरेंना लगावला आहे.आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. पुढे ही पोहचत राहणार आहोत. निश्चितपणे जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारं हे सरकार आहे. नवीन सरकारने आणलेल्या योजना अनेकांपर्यंत पोहचत आहेत, असंही पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1 रुपयात सुरू केलेली पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राज्यात सध्या पावसाने ब्रेक घेतला आहे, मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो अशी परिस्थीती येऊ नये पण, दुर्दैवाने दुष्काळाची परिस्थिती आलीच तर या पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असंही फडणवीस म्हणाले आहेत. विकासकामांना पैसा कमी पडणार नाही. मराठवाडा, नगर या भागातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी संपवायचा आहे. वाहून जाणार पाणी इकडे वळविण्यासाठी लवकरच काम सुरू करतोय. आपल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम करतोय. नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयात पीक विमा योजना अनेक योजना आणल्या आहे. दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवरही सडकून टीका केली. राज्यात आज एक मजबूत सरकार आहे. तरीही काही लोक दिवसा स्वप्न पाहत आहे. सांगतात की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा लक्ष मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे आहे पण त्या खुर्चीच्या रक्षणासाठी आमचं त्याकडे लक्ष आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना जागा दाखवू, असा इशाराही यावेळी फडणवीसांना विरोधकांना दिला.
