महाराष्ट्राचं राजकारण कळण्याइतपतही विजय वडेट्टीवार मोठे नेते नाहीत – शहाजीबापू पाटील

महाराष्ट्राचे राजकारण कळण्याइतपतही विजय वडेट्टीवार मोठे नेते नाहीत,अशी सणसणीत टीका शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.सध्याच्या काँग्रेसमध्ये राज्यात एकही प्रभावी नेता राहिलेला नाही. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी‌ पक्षनेतेपद देण्यात आलेले आहे, असा पलटवारही त्यांनी केला.

शहाजीबापू पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे देशात प्रबळ आणि मोठे आहे. महाराष्ट्राचं राजकारण कळण्याइतपतही विजय वडेट्टीवार हे मोठे नेते नाहीत. आपले अस्तित्व टिकवण्याची त्यांची ही धडपड सुरू आहे, असा टोलाही शहाजीबापूंनी लगावला. आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या काँग्रेसमध्ये राज्यात एकही प्रभावी नेता राहिलेला नाही. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी‌ पक्षनेतेपद देण्यात आलेले आहे, असा पलटवारही त्यांनी केला. महाराष्ट्र राज्य हे देशात प्रबळ आणि मोठं आहे. राज्याच्या राजकारणातील खुर्ची कधी बदलणार हे कळण्याइतपत विजय वडेट्टीवार हे मोठे नेते नाहीत. आपलं अस्तित्व टिकवण्याची त्यांची ही धडपड सुरू आहे, असा टोलाही शहाजीबापूंनी लगावला.आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणारच असल्याचे मी ठासून सांगतो, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सप्टेंबरमध्ये सत्तेतून पायउतार होणारच आहेत. असा दावा वड्डेटीवार यांनी केला होता.