एक देश, एक निवडणूक निर्णय समर्थनीय आणि स्वागतार्ह – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र सरकारने अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यानंतर देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (एक देश, एक निवडणूक) यावर एक समिती गठित केली आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेसह सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही एकत्रच होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होऊ लागला आहे. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी मोदी सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित पवार म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (एक देश, एक निवडणूक) भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्यानं कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळं एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (एक देश, एक निवडणूक) भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो.” तसेच, “वन नेशन, वन इलेक्शन’ (एक देश, एक निवडणूक) मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे.”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचं समर्थन केलं आहे.

यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो. असं अजित पवार म्हणाले.