राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यात अखिल भारतीय समन्वय समिती बैठक; १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा महाराष्ट्रातील पुणे येथे होणार आहे. ही तीन दिवसीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत होणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे. गेल्या वर्षी ही बैठक छत्तीसगढमधील रायपूर येथे झाली होती.

अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित होते. हा बहुमान यंदा पुण्याला मिळाला आहे. या बैठकीत संघप्रेरित राष्ट्र सेविका समिति, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद अशा ३६ संघटना सहभागी होतील. गेल्या वर्षी ही बैठक छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसीय बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव आणि कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत.

या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पाच सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत संघप्रेरित ३६ विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्र सेविका समिति, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटना बैठकीत सहभागी होतील. या सर्व संघटना आणि त्यांच्याशी संबंधित पदाधिकारी समाज जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सेवा, समर्पण आणि राष्ट्र भावनेने सक्रिय असतात.

बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव व कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. सामाजिक बदलाच्या विविध क्षेत्रातील कारक कृतींवरही चर्चा केली जाणार आहे.