उद्धव ठाकरे दोन वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? बच्चू कडूंचा सवाल

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबबादारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे दोन वर्ष मुख्यमंत्री होते मग तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल केला आहे.दिव्यांग कल्याण विभागाच्या कार्यक्रमानिमित्त आमदार बच्चू कडू धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की आता पोलिसांनी लाठचार्ज केला म्हणता, मग तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा का आरक्षण दिले नाही?असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

पोलिसांनी लाठचार्ज केला म्हणून ठाकरे गट टीका करत आहे. मग तुम्ही मुख्यमंत्री होते, तेव्हा आरक्षण का दिले नाही. ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळी सांगत होतात की, हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे. २०१४ मध्ये अध्यादेश आणला आणि २०१८ मध्ये कायदा केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याने संबंधित कायदा रद्द झाला. ही एक प्रक्रिया आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एक निर्णय घेतला आहे की, जे मराठा आहे ते कुणबी आहे आणि कुणबी आहेत ते मराठा आहेत. ज्यांच्या दप्तरी अशी नोंद असेल त्यांना यापुढे कुणबी प्रमाणपत्र मिळेल. पण याला वेळ लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दिव्यांग मंत्राल्यावरूनहि निशाणा साधला.”अडीच वर्ष मी मंत्री असताना मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिव्यांग मंत्रालयाची मागणी केली. जर तुम्ही दिव्यांग मंत्रालय दिले तर हा बच्चू कडू तुमचा आयुष्यभर गुलाम राहिल असे बोललो, परंतु त्यांनी ते दिले नाही,” असे बच्चू कडू म्हणाले.”गुवाहाटी जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला. मी त्यांनी म्हणालो होतो, मी येतो पण दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे , ते त्यांनी मान्य केले,” असे सांगत बच्चू कडूंनी ठाकरेंनी आपली अडीच वर्ष निराशा केल्याचे सांगितले.”विधानसभेत मी प्रामाणिकपणे काम करतो, दिव्यांगाशिवाय काहीही बोलत नाही. देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात झाले,” असे बच्चू कडू म्हणाले.