छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे वर्षाअखेर भारतात येणार; करारासाठी सांस्कृतीक कार्यमंत्री महिनाअखेरीस लंडनला जाणार

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच मायभूमीत परत येणार आहे. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ही लंडनमध्ये आहेत. ती महाराष्ट्रातृपरत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहे. माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी ती परत देण्यास मंजूरी दिली आहे. शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक करार करणार आहे.

ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं परत करण्याबाबत ब्रिटनच्या आधिकाऱ्यांनी होकार कळवला असून हा करार पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतीक कार्यमंत्री महिनाअखेर लंडनला जाणार आहेत. या करारानंतर ही वाघनखं या वर्षाअखेर भारतात परत येऊ शकतात.

या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर मनुगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.

ही वाघनखे परत भारतात आणण्यासाठी ब्रिटनसोबत सामंजस्य करार करावा लागणार आहे. इतकेच नाही तर या दौऱ्यात सुधीर मुनगंटीवार हे शिवरायांची जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तू देखील पाहणार आहोत. ज्या यूकेमध्ये प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत. अफझलखानच्या वधाची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित 10 नोव्हेंबर आहे परंतु आम्ही हिंदू तिथी कॅलेंडरनुसार तारखा ठरवत असल्याचे, सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघनखे हा इतिहासाचा अनमोल ठेवा असून त्यांच्याशी राज्यातील जनतेच्या भावना निगडीत आहेत. त्यांचं हस्तांतरण वैयक्तिक जबाबदारी आणि काळजीपूर्वक केले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.