राज्यातील राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विजयाचे दावे करत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी महाविकास आघाडीला टोचणारा दावा केला आहे.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे वेळच सांगेल. मी आधीच सांगितलं आम्ही 48 जागा जिंकणार आहोत. मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो. माझ्या सांगण्यात चूक होत नाही. मी पुन्हा सांगेल की आऊटऑफ 48, एकही जागा आम्ही हरणार नाही. काँग्रेस सांगते आम्ही 32 जागा जिंकू. मात्र हा मोठा विनोद आहे. वास्तवता जे आहे ते बोललं पाहिजे. मी कधीही अवास्तव बोलत नाही.
मराठा आरक्षणाच्या मुद्दावर गिरीश महाजन म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण न मिळण्यामागे उद्धव ठाकरेच दोषी आहेत. वटहुकूम काढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर निघाले नसल्याचे म्हणत महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांच्या आंदोलनात झालेल्या प्रकारानंतर विरोधकांनी राजकीय पोळी भाजण्याचे काम केलं असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
