मराठावाड्याची राजधानी मानली जात असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. यावेळी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या कामाबाबत माहिती देताना मागच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेसाठी २७७४ कोटी रुपये दिले. त्याशिवाय रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपये दिले. मराठावड्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. पावसाचं वाया जाणार पाणी वळवलं पाहिजे.
यावेळी बोलतांनी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात परदेशी गुंतवणूक यासाठी महाराष्ट्र एक नंबरवर होता. मात्र मधल्या काळात मागे पडला. आता पुन्हा तो 1 नंबरवर आणण्याचा प्रयत्न करतोय, असे शिंदे म्हणाले. “राज्यभरातीय पायाभूत सुविधांना आपल्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. आपले सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्षात या सर्व पायाभूत सुविधांचा विकास ठप्प झाला. काम ठप्प होती. पण आपले सरकार येताच आपण सर्व कामांना चालना दिली. त्यामुळे आज आपण अनेक उपक्रम करत आहोत”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
आपला देश प्रचंड प्रगती करतो आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणली. जी २० ची परिषद दिल्लीत झाली तिथे सगळ्या जगातून लोक आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, युरोपातल्या देशांचे प्रतिनिधी सगळेच आले होते. जगाला भारतात आणण्याची जादू, जगाचं मन जिंकण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आम्हालाही अभिमान वाटला. आपला देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्या क्रमांकावर जाईल याच्या मनात माझ्या मनात शंका नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
पाऊस पडेल आणि कोठा पुर्ण करेल असं वाटतय. पण सरकार आपल्या पाठीशी आहे. आम्ही एनडीआरफचचे नियम डावलून मदत दिली. 1 रुपयात पिक विमा योजना दिली. केंद्र सरकारचे सहा हजार त्याचप्रमाणे राज्य सरकारही सहा हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सक्षमीकरण याला ही प्राधान्य दिलं आहे. शासकिय नोकऱ्या दिड लाखांपर्यंत आकडा जाणार आहे. यासाठी मंगल प्रभात लोढा ही स्किल डेव्हलपमेंट विभागातर्फे प्रयत्न करत आहे.असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
