वॉटर ग्रीड संदर्भात आपण मान्यता दिली होती. आठ पैकी एका जिल्ह्याचे टेंडर काढून कामही सुरू केले होते. परंतु, दुर्देवाने प्रश्न विचारणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने उद्धव ठाकरेंनी वॉटर ग्रीड प्रकल्पाची हत्या केली. त्यामुळे कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे आम्हाला माहीत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मराठवाड्यात राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 ऑक्टोबर 2016 रोजी मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. तसेच, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाने बैठक होऊ नये, असा प्रयत्न केला. बैठकीतून काय मिळणार? असा सवाल उपस्थित केला. जे स्वत: काही करत नाहीत, ते नाव ठेवण्याचं काम करतात. तुम्ही अडीच वर्षात काय केलं?”“2016 सालच्या बैठकीत 31 निर्णय घेण्यात आले होते. 22 विषय अवगत तर काही विषयांवर निर्देश झाले होते. 31 विषयांचा आढावा 2017 साली घेण्यात आला. तेव्हा 10 विषयांवरील कार्यवाही पूर्ण झाली. 15 विषयांवर कार्यवाही टप्प्यात होती. 6 विषयांवर कार्यवाही अपूर्ण होती. 2023 मध्ये 31 पैकी 23 विषय पूर्ण झाले आहेत. 7 प्रगतीपथावर, तर 1 विषय उद्धव ठाकरे यांच्या काळात व्यपगत झाला आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
तर 16, 964 हेक्टर सिंचन क्षेमता तयार झाली आहे. 434 हेक्टरचं भूसंपादन पूर्ण करण्यात आलं आहे. लाभाक क्षेत्रामध्ये 30 पैकी 23 हजार हेक्टरच काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यात 4 उपसा सिंचन योजनाही मंजूर करण्यात सुरू करण्यात आहेत. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प ज्याला 2,342 कोटींची सुप्रमा दिली होती. त्यात 2164 कोटी खर्च करण्यात आले आहेत. अशा अनेक कामांची यादी यावेळी फडणवीसांनी वाचून दाखवत 2016 ला घेतलेल्या बैठकीतील बहुतांश निर्णयांची अंमलबजावणी झाली होती. असं त्यांनी यावेली विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाबाबत मोठं विधान केलं आहे.फडणवीस म्हणाले की, मी देखील केंद्रेकर यांचा अहवाल पाहिला. त्यांची समिती अधिकृत नव्हती. त्यांनी चांगल काम केलं. त्यांची शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठीची जी काही मतं आहेत, त्याचा आम्ही नक्की विचार करणार आहोत. आता ज्याकाही उपायोजना मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या, त्या शेतकरी आत्महत्या रोखण्याशी संबंधीतच आहे. दुधाळ जनावरे देणं ही उपायोजना आहे. मराठवाड्यातील सर्व गावं त्यात समाविष्ट करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
