अधिवेशन छोट्या कालावधीसाठी असलं तरीही देशासाठी महत्त्वाचं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसदेचं विशेष अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे सत्र भरवण्यात येत असून संसदेत दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, भारताचा तिरंगा चंद्रावर अभिमानाने फडकत आहे. चांद्रमोहीम यशस्वी झाल्याने जगभरात भारताचा सन्मान वाढलाय. तसेच आपण जी २० परिषद यशस्वी करुन दाखवलेली आहे, त्यामुळे भारताचा गौरव होत आहे.

संसदेचं अधिवेशन नव्या ठिकाणी होणार आहे. नव्या ठिकाणी जातानाच भारताला 2047 पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र करायचं आहे. हे अधिवेशन अनेक प्रकारे महत्त्वाचं आहे. सर्व खासदारांनी या विशेष अधिवेशनातील कामकाजात जास्तीत जास्त भाग घ्यावा असं आग्रह मी खासदारांना करत आहे. जीवनात काही क्षण असे येतात की ज्यामुळे उत्साह वाढतो. त्यामुळे आता सर्व वाईट गोष्टी सोडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत जाऊया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.चंद्रावर तिरंगा फडकत आहे. तिथलं शिवशक्ती पॉईंट हा आपल्या प्रेरणेचं केंद्र आहे. जी-20 परिषदही यशस्वी पार पडली. अनेक संधी आणि शक्यता आपल्यासमोर निर्माण झाल्या आहेत. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला आहे. देशात उत्साहाचा वातावरण आहे. संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी भलेही छोटा असेल. पण काळाच्या हिशोबाने अधिक मोठा आहे. 75 वर्षाचा हा प्रवास आता नव्या मुक्कामातून सुरू होत आहे. हे ऐतिहासिक निर्णयाचं अधिवेशन असेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

“भारताला अभिमान वाटावा असे क्षण एकामागून एक आले आहेत. संपूर्ण देशात उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आपण अनुभवत आहोत. त्याचवेळी संसदेचे हे अधिवेशन होत आहे. हे सत्र लहान असले तरी वेळेच्या दृष्टीने खूप मोठं आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल,” असं मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “उद्या गणेश चतुर्थीला आम्ही नवीन संसदेत जाऊ. भगवान गणेशाला ‘विघ्नहर्ता’ म्हणूनही ओळखले जाते, आता देशाच्या विकासात कोणतेही अडथळे येणार नाहीत. संसदेचे हे अधिवेशन लहान असले तरी ते ऐतिहासिक आहे.”

दरम्यान, यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला. “मी सर्व सदस्यांना आग्रह करेन की हे छोटं अधिवेशन आहे. तुमचा जास्तीत जास्त वेळ या अधिवेशनाला मिळावा. रडारड करण्यासाठी बराच वेळ आहे. ते तुम्ही करत राहा. आयुष्यात असे काही क्षण येतात, जे आपल्यात विश्वास निर्माण करतात. मी या छोट्या अधिवेशनाला त्या दृष्टीने पाहातो. मी आशा करतो की जुने वाद सोडून, चांगल्या गोष्टी सोबत घेऊन आपण नव्या संसदेत प्रवेश करू”, हे अधिवेशन छोट्या कालावधीसाठी असलं तरीही देशासाठी महत्त्वाचं. या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार आहेत”, असं मोदी म्हणाले.