2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवारांचीच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

देशाच्या मूडवरून महाराष्ट्राचा मूड समजू शकत नाही. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रेम आहे, असे मोठे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये वक्तव्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी 2019मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना ही शरद पवारांचीच असल्याचा गौप्यस्फोट केला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 मध्ये शिवसेनेने आमचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी बोलावले जात असल्याचे लक्षात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्याने आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा प्रस्ताव दिला.

त्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही भाजपसोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर टाकण्यात आली. आम्ही पोर्टफोलिओ, जिल्हे याबाबत निर्णय घेतला, त्या प्रक्रियेत राष्ट्रपती राजवट लावण्याचे ठरले आणि त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला. हे योग्य नाही, असे अजित पवारांना वाटले. त्यामुळेच आम्ही भाजपसोबत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

शरद पवार मोठे व्यक्ती, मोठे नेते‎आहेत. ते नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी‎करतात. उद्धव ठाकरेंनी आमचा‎विश्वासघात केला त्यावेळी‎पवारांचीच आमच्यासोबत सरकार‎स्थापन करण्याची इच्छा होती. पण‎त्यानंतर जे काही घडले ते तुम्ही‎सर्वांनी पाहिले. हेच सत्य आहे,‎असेही फडणवीसांनी सांगितले.‎ यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही देशाच्याच्या मूडवरून महाराष्ट्राचा मूड समजू शकत नाही. महाराष्ट्रात मोदींबद्दल प्रेम आहे. त्यामुळेच आपण ही भावना पकडू शकत नाही की, आम्ही महाराष्ट्रात 48 पैकी 49 जागा जिंकू शकत नाही. त्यामुळेच आम्ही 40 पेक्षा अधिक जागा जिंकणार, असा आमचा दावा आहे.

कोणतेही सरकार चालवणे हे आव्हान असते. एक भागीदार असो, दोन असो किंवा कोणीही असो, तरीही आव्हाने आहेत. काहीवेळा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार घडतात, तर कधी घडत नाहीत. आघाडी सरकारच्या काही अडचणी आहेत, पण त्याचे काही फायदेही आहेत.असंही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.