मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

नक्षलवाद्यांच्या संदर्भात करायवयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती. यावेळी ७ ते ८ राज्याचे मुख्यमंत्री आले होते, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युतर दिलं आहे. कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार त्यांच्या सरकारमध्ये झालाय. नांदेडमधील प्रकार दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पण, यात राजकारण केलं जात आहे ते आणखी दुर्दैवी आहे. ज्यांना मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय लागली आहे. त्यांच्याकडून आपण अधिक काही अपेक्षा करु शकत नाहीत, असं प्रत्युत्तर शिंदे यांनी दिलं आहे.

कोरोनाकाळात आम्ही पीपीई किट घालून फिरत होतो आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते, असा पलटवार केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे पीपीई किट घालून फिरत होतो आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते. राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून काम करू शकतो हे सांगत असणाऱ्यांचं सत्य बाहेर येईल. भ्रष्टाचाराचे पैसे कुठे जात होते हे लवकरच बाहेर येईल. सुप्रिम कोर्टानं तारिख देऊन सुनावणी पुढे गेली, सुप्रीम कोर्टाला अनेक कामे आहे. यांच्या बाजूने निकाल लागला तर चे चांगलं आणि वेगळे काही बोलले तर चुना आयोग म्हणतात.

उद्धव ठाकरे सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, मृतांचे राजकारण केले हे दुर्दैव आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खायची सवय लागली आहे. कोविडमध्ये मृतांच्या बँगमधे पैसे खाणारे हे बोलतात. नांदेड घटनेची सगळी चौकशी होऊ दे, दोषींना पाठीशी घालणार नाही. कोविडमधे तोंडाला मास्क लावून बसत होते. आम्ही पीपीई किट खालून फिरत होतो. अशा प्रकारचे मुख्यमंत्री जगाने पाहिले नाहीत. ठाकरे घरात बसून पैसे मोजत बसले होते. कोरोना काळात त्यांचा खरा चेहरा समोर आला. मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचाराचे पैसे कुठे गेले हे बाहेर येईल. नगरसेवक देखील घरात बसून काम करु शकत नाही. त्यामुळे घरात बसून काम करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला सांगू नये, अशी टीका शिंदे यांनी केली.