नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयांत रुग्णांचे मृत्यू झाल्याचं प्रकरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. रुग्ण मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. त्यावर आता सत्ताधारी बाजूने भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं.उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?
यामध्ये पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांनी “मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे असा खोचक टोलाही लगावला. उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार! उद्धवजी, तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही? अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
