राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर 13 ऑक्टोबरला होणार सुनावणी

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधात राष्ट्रवादीच्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार दिला आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षाविरोधातली प्रकरणाची सुनावणी एकत्रित होणार आहे. शुक्रवारी 13 ( ऑक्टोबर) तारखेला दोन्ही प्रकरणं एकत्रित ऐकू असं कोर्टाने म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर तीन नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती 13 ऑक्टोबरला होणार आहे.

‘विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. मात्र, त्यांनी आणखी कुठलीही कारवाई केली नाही. अध्यक्ष वेळखाऊ पणा करत आहेत म्हणून त्यांना कारवाईचे निर्देश द्या’, असं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आमदार अपात्रतेसंबधीच्या सुनावणीची तारीख ठरली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील आमदार अपात्रतेची सुनावणी आता एकत्रितपणे पार पडणार आहे. शुक्रवारी 13 ऑक्टोबर ला ही सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना अपात्रतेची सुनावणी आधी पुढच्या महिन्यात पार पडणार होती, मात्र, आता ती शुक्रवारी13 ऑक्टोबर ला पार पडणार आहे.

अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी या सुनावणीवर भाष्य केलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरण क्लॅप केलं आहे. या याचिकांवर एकत्र यावर सुनावणी होईल. 13 ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे. ती सुनावणी आधी पुढच्या महिन्यात गेली होती. पण ती सुनावणी आधीच होईल. आता सुनील प्रभू आणि जयंत पाटील या दोन्ही याचिकेवर एकत्र सुनावणी होईल. या दिवशी सर्वोच्च न्यायालय काहीतरी निर्देश 13 तारखेला देऊ शकतं. ठाकरे गटाच्या याचिकेवर तीन नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती 13 ऑक्टोबरला होणार आहे, अशी माहिती अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.