राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली असून विविध निर्णय आणि घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण आणणार असल्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासह अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन दिली आहे. राज्यातील सुतगिरण्या सुरळीत चालण्यासाठी कर्जावरील व्याज भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. शिवाय राज्यामध्ये आणखी चार धर्मादाय सहआयुक्त पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती होती.
👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे –
✅ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार
✅ महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार
✅ राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार
✅ कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.
✅ इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार
✅ बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण
✅ राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार
✅ अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय
