अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलिया यांची आत्महत्याच होती. सध्या कोर्टात सूर असलेल्या केसमध्ये तुम्हाला चिंता का वाटते. त्यावेळी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते ना? त्यामुळे या प्रकरणात आता जी काही नावे समोर येत आहेत. त्यामुळे लवकरच योग्य माणसाला शिक्षा मिळणार असून दिशा आणि सूशांतला लवकरच न्याय मिळेल, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. दिशा सालिया आणि सुशांत सिंग प्रकरणात वरून काही दिवसांपासून चांगलेच राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी आहे का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
दिशा सलीया हीचा इमारतीवरून पडुन मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसातच अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने राहत्या घरात गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळला होता. त्यावरून आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात येत आहे. राणे कुटुंबियांकडून सातत्याने त्याचा उल्लेख करत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य लवकरच समोर येणार असून त्यातून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.मात्र नितेश राणे यांनी आज पुन्हा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला असून दिशा सालीया आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावर भाष्य केले आहे.
