कंत्राटी भरती विषयी गेल्या काही दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांकडून राळ उठवली जात आहे. त्याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद देत मोठे खुलासे केले आहेत. कंत्राटी भरती हे मागच्या सरकारच म्हंजे उद्धव ठाकरे सराकरच पाप आहे, त्यांनीच याला मान्यता दिली. हे संपूर्ण पाप काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार.यांच्या सरकारचे आहे. यांना आमच्यावर आरोप करताना लाजा वाटल्या पाहिजे, शरम.वाटली पाहिजे या शब्दात फडणवीस यांनी मागच्या सरकारचा समाचार घेतला.
मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांनी हे खुलासे केले आहेत. त्यांनी मागच्या सरकारने ने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत असल्याचे देखील फडणवीस यांनी माध्यमांसमोर सांगितले. हे शंभर टक्के पाप मागच्या सरकारचे आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, मागच्या सरकारने कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून कंत्राटी भरतीला काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केली होती. तसेच २००३ साली काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्यात आली होती. त्यानंतर २०१० साली देखील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना दोनदा कंत्राटी भरती काढण्यात आली. तस्केह २०११ साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना कंत्राटी भरतीचा जी आर काढण्यात आला होता. कंत्राटी भारती ही २०१३ सालीही करण्यात आली. त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. मात्र हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
