ड्रग्ज माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी चेन्नई मधून अटक केली होती. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देत साधारण २०२०मध्ये त्यावेळी असलेल्या शिवसेनेचा ललित पाटील हा नाशिकचे शिवसेनेचे प्रमुख होता. त्याला अटक झाल्यानंतर त्याला १४ दिवसांचा पीसीआर मिळाला होता. मात्र, या १४ दिवसांच्या काळात ललित ससून रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे तो भरती झाला त्याला कोणाचा आशीर्वाद होता? तसेच माजी मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत, का? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिली. फडणवीस यांनी सांगितले की, जेव्हा ललित पाटील याला १४ दिवसांची पोलीस रीमांड असताना तो पूर्णवेळ रुग्णालयात का होता? एवढंच नाही तर त्यावेळी त्याची चौकशी देखील पूर्ण झाली नाही. तरी सुद्धा पोलिसांनी कोठडी का वाढवली नाही, या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत, यावर अधिक बोलणे सध्या तरी बोलणे उचित होणार नाही. त्यामुळे नार्को टेस्ट कुणाची व्हायला हवी हे तुम्ही सांगा, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
काय आहे ललित पाटील प्रकरण…
ज्यावेळी नाशिकमध्ये तब्बल 326 कोटींचा मेफेड्रीन (एमडी ड्रग्ज) तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. तेव्हा राज्यात खबो उडाली होती. याचा मुख्य सूत्रधार ललित पाटील हा असल्याचे.समोर आले. त्यानंतर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर १६ दिवसांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
