मी नेहमी आठ शर्ट सोबत घेऊन फिरतो. कारण दोनदा माझ्या अंगावर शाही फेकली, तेव्हा मी तिसऱ्या चौथ्या मिनिटाला शर्ट बदलून नागरिकांचे पाचशे पाचशे निवेदन स्वीकारले आहेत. त्यामुळे कोणी काही फेकलं तरी मी घाबरत नाही. होणाऱ्या घटनेसाठी मी नेहमी तयार असतो आणि होणारी घटना कशीही होऊ शकते, आपण आपल काम करत राहायचं असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
अमरावती येथे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचे.स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत.बैठक घेतली. शाई फेक प्रकारानंतर चंद्रकात पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आजही अमरावतीमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपकडून चंद्रकांत.पाटील यांना अमरावती आणि सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
