शरद पवार यांचा बुरखा देवेंद्र फडणवीस यांनी फाडला; गोपीचंद पडळकर यांची टीका

कंत्राटी भरती वरून ज्या पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू होता. त्यांचा बुरखा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाडला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर हा महाविकास आघाडीच्या काळात काढण्यात आला होता. शरद पवारांच्या सल्ल्याने त्यांच्या कृपा आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या सहीने काँग्रेसच्या मदतीने हा जीआर काढला होता. त्यांचं हे पितळ सर्व आता उघडं पडल आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने प्रयत्न करत आहेत. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात प्रवाही बैठक घेतलेली आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या तयारीत आमचं सरकार आहे ओबीसीचे आरक्षण सध्या 16% आहे. जर पुन्हा मराठा समाजाला या ओबीसीच्या 16 टक्के मधून आरक्षण दिलं तर मराठा समाजाला काय मिळणार असेही ते म्हणालेत आहेत.