गेल्या काही दिवसांपासून ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण चर्चेत आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात थेट आरोप करत उद्धव ठाकरे गटाचा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून या ललित पाटील प्रकरणात खासदार संजय राऊत यांना अटक होईल अशी भीती वाटते का ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. ललित पाटीलला भांडुप नाशिक कोण गाडीत घेऊन जायचं? आता या प्रकरणातील सर्व बाहेर येणार असून अटकेची भीती राऊतांना वाटत आहे. यामुळे संजय राऊत लवकरच आर्थरोड जेलमध्ये ते दिसतील असे थेट टीका नितेश राणे यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी ही टीका केली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या बद्दल देखील त्यांनी भाष्य केले आहे.यावेळी नितेश राणे म्हणाले की, दिशा सालियान आणि सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास पुढे पुढे सरकत आहे. त्याने आता आदित्य ठाकरे हे परदेशात पळून जाणार असल्याची माहिती मला समजली आहे, त्यामुळे अटक टाळण्यासाठी परदेशात.पळून जाणार आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
दिशा सलियान आणि सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव नितेश राणे यांनी सातत्याने घेत आहेत. त्यामुळे आता तपासाला वेग आला असून दसरा झाल्यावर आदित्य ठाकरे परदेशात पळून जाणार असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत.
