राज्य सरकार टिकणार आरक्षण देणार आहे . कायदेशीर अडचणी काही येत आहेत. सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा होणार आहे. खर तर आम्ही दिलेल आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेले. त्यांना त्या विषयाच गांभीर्य नव्हते. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरेंनी कधी मराठा आरक्षणाविष्यी शब्द काढलेला आठवत नाही. उलट त्यावर सामनातून टीका करण्यात आली. अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी चर्चा केली.
यावेळी विखे पाटील यांनी सांगितले की पवार साहेब राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात १५ वर्षे मंत्री होते. त्याच्या कालखंडात मराठा समाजासाठी त्यांचं काय योगदान आहे हे जाहीर करावे. कधी प्रयत्न केले ? त्यांनी जो मागे निर्णय घेतला. त्याचे परिणाम आज मराठा समाज भोगत आहे. कधी तरी त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे पाटील म्हणालेत. खर तर रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला किती महत्व द्यायचे हाच खरा प्रश्न आहे. यात्रा सुरू ठेवली काय आणि बंद ठेवली काय माझ्या दृष्टीने महत्वाचं नसल्याचे ते म्हणाले.
