एकनाथ शिंदे हे अपात्र झाले तरी मुख्यमंत्रीपदी तेच राहतील,कारण अपात्र झाले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले जाईल. त्यामुळे शिंदे अपात्र झाल्यावर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील. यासाठी ते सत्तेत आल्याच्या चर्चांना त्यांनी संगितले की, अजित पवार यांना आम्ही उपमुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता तो आम्ही पाळला आहे, आणि त्याच वेळी मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेच राहतील असे देखील त्यांना सांगण्यात आले होते. असे विरोधकांचे सर्व आरोप उपमुख्यमंत्री यांनी खोडून काढले आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे खुलासे केले आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपत्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे.विरोधकांनी सरकारवर आरोप करत आहेत.
यावेळी फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री अपात्र झाले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले जाईल. त्यामुळे कोणातही बी प्लॅन नसून हा ए प्लॅन असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून च काम केले आहे. ज्याला कायद्यातले कळते त्याला या सर्व गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अपात्र होतील असा तर्क लावणे तसे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
