आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देणारच त्यामुळे सर्व मराठा बांधवांनी धैर्य आणि धीर ठेवावा, कुणीही टोकाची पाऊले उचलू नये, सरकारने समाजाला समजून घ्यावे, मराठा समाजाला आरक्षण देणारच असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
कोल्हापूर येथे रात्री उशिरा कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही ग्वाही दिली आहे.
यावेळी शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. या आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या सध्या त्यावर काम सुरू आहे. तसेच कुणबी दाखले देण्याबाबत जी शिंदे समिती नेमण्यात आली आहे ती चांगले काम करत आहे.
आतापर्यंत आठ ते दहा हजार जुन्या नोंदी शोधल्या गेल्या आहेत. त्या हैद्राबाद येथे जाऊन त्या नोंदी तपासल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व कामाला काही कालावधी लागणार असून मराठा समाजाने शांतता राखावी असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
