मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांना अटक करुन गुन्हे दाखल करा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीसारख्या घटना घडल्या आहेत. मनोज जरांगे यांनी शांततेचे आवाहन केले असताना देखील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या सर्व परिस्थितीचा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कार वाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला सर्व राज्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे व जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत. तसेच अशा समाज कंटकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या बैठकीत आणखी मुद्द्यांवर देखील चर्चा झाली असल्याचे पुढे आले आहे.

आजच्या बैठकीत मराठा आरक्षाबाबत निर्णय होणार असून लवकरच या बैठकीतून हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा सर्वांना लागली आहे.