आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारकडून वेगवान हालचालींना वेग आला आहे. आज महत्वाची बैठक होण्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती.समोर आली आहे. या चर्चेतून जरांगे यांना तब्येत सांभाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मराठ्यांना अर्धवट आरक्षण नको असे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, आणि आजपासून पाणी पिण्याची देखील तयारी त्यांनी.दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांशी सोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जारांगे आता अभ्यासाकांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेनंतर जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधणार आहेत, त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेलं बोलणे तेब्या पत्रकार परिषदेत मांडतात का हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत जारांगे पाटील प्रत्येक नेत्याचा फोन लाऊड स्पिकरवर लावून सर्वांना ऐकवत असतं मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेले बोलणे त्यांनी जाहीर केलेले नाही.
त्यामुळे पुढील काही गोष्टी काही तासातच समोर येणार असल्याने सर्वांची उत्सुकता वाढली आहे.
