कुस्त्यांचा थरार रंगणार! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ७ नोव्हेंबरपासून

राज्यातील पैलवानांनासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्याील फुगावमध्ये रंगणार आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप, ट्रॅक्टर आणि रोख बक्षीस मिळणार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, सरचिटणीस पै. योगेश दोडके आणि पै. विलास कथुरे उपस्थित होते. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार. तर स्पर्धेच बक्षीस वितरण १० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण ५० हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडीयम उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे. ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ या कुस्तीस्पर्धेत सहभागी होणार आहेत. माती तसेच गादी गटात कुस्ती खेळवली जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल.

या स्पर्धेत ३६ जिल्हा आणि ६ महानगरपालिका असे एकूण ४२ संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील १० आणि माती विभागातील १० असे एकूण २० कुस्तीगीर २ कुस्ती मार्गदर्शक आणि १ संघ व्यवस्थापक असे एकूण २३ जणांचा सहभाग असणार आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेत ८४० कुस्तीगीर ८४ कुस्ती मार्गदर्शक आणि ४२ व्यवस्थापक, ८० पंच आणि ५० पदाधिकारी असे एकूण ११०० जणांचा सहभाग असणार.