राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फुटीनंतर, खरा पक्ष कुणाचा? याचा वाद निवडणूक आयोगामध्ये सुरु आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत भाष्य केलं आहे. शिवाय त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेलाही उत्तर दिलं.अजित पवारांनी २ जुलै रोजी ८ सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कृतीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता अजित पवार गटासोबत ४३ ते ४५ आमदार असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कुठल्याही गटाने अशी अधिकृत माहिती दिलेली नाही.
राज्यातल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं. खासदार राऊत म्हणाले, मराठा-ओबीसी मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होत आहे. मला तर वाटतंय की, कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील. मंत्रिमंडळ बैठकीत टोळीयुद्ध सुरू आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली आहे.
संजय राऊत यांच्या या दाव्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ म्हणाले, ते म्हणाले की, संजय राऊत यांचा गँगवॉरचा आरोप खोटा आहे. राऊत यांनी गँगवॉरचे पुरावे द्यावेत. खरे असेल तर आम्ही राजीनामे देतो, खोटे आरोप राऊत करतात असं मुश्रीफ म्हणाले.
