दहावी पास असणारे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ही केली जाईल. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. नोकरीचे ठिकाण हे औरंगाबाद असणार आहे. ही मोठी संधी दहावी पास असणाऱ्यांसाठी असणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर मध्ये विविध जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया 150 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
तारतंत्री ट्रेड एकून पदसंख्या 65, वीजतंत्री ट्रेड एकून पदसंख्या 65, संगणक चालक एकून पदसंख्या 20 याप्रमाणे उमेदवाऱ्यांची निवड ही केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करताना याची काळजी घ्यावी की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या जागेसाठी करत आहोत. आयटीआय केलेल्या तरूणांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रिशियन/वायरमन/कोपा इत्यादी पदांचा समावेश असून उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज 06 डिसेंबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत, यामध्ये उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी पास तसेच NCVT टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.www.apprenticeshipindia.org या साईटवर उमेदवाराची नोंदणे असणे आवश्यक आहे.
