संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. संसदेच्या कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली आहे. या तीन व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात शिरल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही व्यक्तींना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले असून, ते कोण आहेत त्यांच्याकडे पास होते का? याची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आजच्याच दिवशी पुन्हा संसदेत तीन अज्ञात व्यक्ती घुसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहुल नार्वेकरांनी मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून नागपूर हिवाळी अधिवेशनात एका आमदार ना दोन पास देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
त्यानंतर आता नागपूर अधिवेशनातही गॅलरी पासेस देणे बंद करण्यात आलं आहे.दोन्ही सभागृहातील गॅलरी पासेसना बंदी केली आहे. दिल्लीमध्ये लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ निर्णय घेतला आहे.अधिवेशनादरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा मांडला. तसेच आपणही काळजी घ्यायला हवी असं म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी जाहीर करत आहे की आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जातील. त्याव्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही.
लोकसभेत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच खबरदारी म्हणून नागपूर अधिवेशनात गॅलरी पास देणं बंद करण्यात आलं आहे. दोन्ही सभागृहातील गॅलरी पासेसना बंदी घालण्यात आली आहे. लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने हा तात्काळ निर्णय घेतला आहे. विधान परिषद उपासभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी सभागृहात ही माहिती दिली. याशिवाय विधानसभेत आता आमदार यांना दोन पास दिले जातील अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात माहिती दिली.
