दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एसआयटी गठित करण्यात आली आहे. यामझ्ये तीन अधिकाऱ्यांचा तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार आहेत. त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढावी किंवा त्यांचा पासपोर्ट जप्त करावा अशी मागणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे म्हणाले मी सरकारचे आभार मानेल. दिशा सालियन असो सुशांत सिंग राजपूत यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम करत आहेत. तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. काल एसआयटी नेमली आहे. या मर्डर आणि गँग रेप प्रकरणातील हे आरोपी मुक्त आणि मोकाट फिरत आहेत. हे सगळे पकडले जातील. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळेल. आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लूक आऊट नोटीस काढावी. पासपोर्ट जप्त करावा. अशी मागणी सरकारकडे मी करत आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपपत्र देण्यास विरोध आहे. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनाच देण्यात यावे. रोहित पवार यांच्या मोर्चावर झालेला लाठीमार नियोजित होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.संजय राऊत आम्हाला राजकीय दलाल वाटतो. स्वतः चा भाऊ मशालवर लढणार की शरद पवार यांच्या चिन्हावर लढणार? हे सांगावं. मशाल चिन्ह नको म्हणून घरात भांडण सुरु आहे. त्याच्या मालकाला पण कमळसोबत यायची इच्छा आहे, मग पायघड्या का घालत आहेत?, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
