“युनिक सायकलची गोष्ट”

आपण सर्वांनी लहानपणापासून बास्केटवाली , एका साखळीला जोडलेले दोन चाक, दोन पेंडल, एक सीट अशाच प्रकारची सायकल पाहिली असेल मात्र विना पेंडल ची सायकल कधी पाहिलीत का? किंवा ट्रेडमील वर चालणारी सायकल पाहिलीत का ? संपूर्ण जगात वेगवेगळ्या विचारांचे आणि वेगवेगळ्या शैलींचे लोक राहतात. एखादी व्यक्ती आपल्या संकल्पनेतून एखादी गोष्ट बनवतो आणि ती हवेप्रमाणे व्हायरल होते. अशीच एक कमाल गोष्ट म्हणजे “पेंडल नसलेली युनिक सायकल” (०५. ऑक्टोबर २०१७)

एका जर्मन डिजाईनर ने आपल्या कमाल शैलीने एक हार्नेस सिस्टम वापरुन रायडर फ्रेमवर बसण्याऐवजी लटकू शकतो यामुळे रायडर मागील चाकाजवळ असलेल्या ट्रेड्सच्या सेटवर पाय ठेवण्यापूर्वी गती वाढवण्यासाठी धावतो. अशा पद्धतीची एक पेंडल नसलेली सायकल तयार केली. या संकल्पनेला कोणतेही पेंडल नाहीत आणि ते स्कूटिंग मोशन तयार करणाऱ्या रायडरवर अवलंबून असतात. सामान्यपेक्षा अधिक वेगाने आणि पुढे प्रवास करताना रहिवाशांना वेग वाढवण्याची संधी मिळते.त्याच प्रमाणे एका पट्ट्यानं चक्क ट्रेडमील सायकल चा शोध लावला आणि त्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला.

दुसरी युनीक सायकल म्हणजे “ट्रेडमिल सायकल” ब्रुइन बर्गमीस्टर याने “ट्रेडमिल सायकल” चा शोध लावला. त्याला गॅरेजमधील क्रॉस ट्रेनरकडून प्रेरणा मिळाली आणि त्याने चाकांच्या दरम्यान एक लहान ट्रेडमिलद्वारे चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आणि एका आगळ्या वेगळ्या सायकलचा शोध लावला. ट्रेडमिल सायकल पूर्णपणे यांत्रिक घटकांवर आधारित आहे, म्हणजे पूर्णपणे गियर प्रमाणावर. ट्रेडमिल रोलवर एक सन गियर जोडलेला असतो जो शाफ्टवर गीअर चालवतो जो गीअर रेशो 2.5 पट वाढवून पुन्हा दुसऱ्या शाफ्टमध्ये प्रसारित केला जातो. हा शाफ्ट चाकावर बसवलेल्या गियरशी जोडलेला असतो. ही सायकल बनवण्याचा ध्येय एकच होतं की, माणसाने आपल्या वर्कआउटकडे देखील लक्ष दिले पाहिजे. एका चार्जवर ह्या सायकलने 30 ते 50 मैल प्रवास होऊ शकतो आणि गीअर्सच्या निवडीमुळे वापरकर्त्याला चालवण्याचावेग आरामात चालण्यापासून वेगवान चालवण्यापर्यंत बदलता येतो.
यांच्यासारखे अनेक क्रिएटिव्ह माणसं आहेत पण त्यांचं कधी जगासमोर आलेलं नाही…