उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जपानी विद्यापीठ करणार गौरव; कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज(मंगळवार, 26 डिसेंबर) जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.या कार्यक्रमात कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. 120 वर्षातील ही पहिली मानद डॉक्टरेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली जाणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असतील. २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर 2018 आणि 2023 मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती.

फडणवीसांच्या जपान दौऱ्यात कोयसान विद्यापीठाने त्यांचे आभार मानले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आलेत. दरवर्षी जपानमध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी होते. महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून, त्यासाठी एक ‘लेटर ऑफ अ‍ॅप्रिसिएशन’ दिले आहे.