पुणे मेट्रोप्रवाशांना नववर्षानिमित्त म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून नवं गिफ्ट देण्यात येणार आहे आहे. पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मेट्रोला मिळणारा प्रतिसाद पाहून या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे मेट्रो प्रशासनाने पिक अवर्स आणि नॉन पीक अवर्स अशा दोन्ही वेळेत गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.आता गर्दीच्या वेळेत दहा मिनिटांऐवजी फक्त 7.5 मिनिटांनी मेट्रो मिळणार आहे. यामुळे पुणेकरांना मेट्रोची वाट पाहत थांबावे लागणार नाही. 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट मार्गाचे लोकार्पण केले होते. आता पुणे मेट्रोच्या या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला आहे.
वाढत्या मागणीला सामावून घेण्यासाठी पर्पललाइन (पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट) 32 जादा फेऱ्या सुरु होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुरळीत होणार आहे. त्यासोबतच अॅक्वालिन (वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक) 31 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे कोथरुड ते रुबी हॉल क्लिनिक प्रवास सोपा आणि कमी वेळात होणार आहे. प्रवाशांना मेट्रोची वाट बघावी लागणार नाही आहे.
1 जानेवारी 2024 पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर बदल केला आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी होती. ती आता 10 मिनिटांनी करण्यात आली आहे. सकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत मेट्रो दर 10 मिनिटांनी असणार आहे. तसेच सकाळी ८ ते 11 हा गर्दीचा वेळ आहे. या वेळी कार्यालयात जाणारे अनेक लोक असतात. यामुळे या वेळेत दर 7.5मिनिटांनी मेट्रो असणार आहे. दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत दर 7.5 मिनिटांनी मेट्रो असणार आहे. यामुळे प्रवाश्यांच्या प्रतिक्षेचा कालावधी कमी होणार आहे. त्यांच्या वेळेची बचत होईल.
