रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी या संदर्भात बैठक घेतली होती. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र संवर्गीय अधिकारी सशास्त्री सीमा बलचे महासंचालक म्हणून काम केले आहे. तसंच, सेंट्रल रिझर्व पोलीस दल च्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले होते. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पोस्ट करण्यापूर्वी शुक्ला यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर विंगचे संचालक म्हणून काम करण्यासह महाराष्ट्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
रश्मी शुक्ला या पुणे पोलिस आयुक्त असतांना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे फोन फोन टॅप केल्याचा तयांच्यावर आरोप होता. या प्रकरणी तयांच्यावर गुन्हा देखील दाखल करत चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पडल्यावर त्यांच्यावरील चौकशी थांबवण्यात आली होती. एवढेच नाही पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ देखील सादर करत त्यांना निर्दोष मुक्त केले होते.
