मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहेत, त्यांचा काही बंदोबस्त केला पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कराड येथील शिवाजी स्टेडियमवर आजपासून कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शन सुरु होत आहे. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाच उदघाटन होणार आहे. या प्रदर्शनात 11 देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तर प्रदर्शनात जवळपास 400 स्टॉल सहभागी झाले आहेत. 42 फूट श्रीरामाच होर्डिंग आणि आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती या प्रदर्शनात आकर्षण ठरत आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट बैलगाडीवरून भन्नाट एन्ट्री घेतली.

‘कराडच्या कृषी प्रदर्शनात 42 लाख रुपयांचा बैल आणण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक बैल ही आलेला आहे. या प्रदर्शनात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी आणण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाच्या संयोजकांना एकच विनंती आहे की आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहेत. त्यांचा काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल तर मला सांगा.’ असे म्हणत संजय राऊत यांचे नाव न घेता टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कराड येथील छत्रपती शिवाजीमहाराज स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, वीज निर्मितीचे शेतात प्लान्ट होतील. पुढील काळात पाण्याचे दर वाढवण्याची वेळ येणार नाही. साखर उद्योगासाठी निर्णय पीएम मोदी यांनी घेतले. यापूर्वी तसे निर्णय झाले नाहीत. मोदींना काय कळते? असेही आरोप झाले. आता महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्याला 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रात इरिगेशनचे प्रकल्प रखडलेले होते ते आम्ही मार्गी लावत आहोत. त्यामुळे साताऱ्यातील दुष्काळी पट्टा आता नावालाही राहणार नाही, असा दावा फडणवी यांनी केली. 40 हजार शेतकरी पिक विमा घेत होते, आता 2 लाख शेतकऱ्यांनी तो घेतला असल्याचेही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साताऱ्यात दुष्काळ नावालाही शिल्लक राहणार नाही अशाप्रकारे कार्य आपण हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचं काम सरकार करत आहे. मोदी सरकारने साखर उद्योगांसाठी घेतलेले निर्णय सुवर्ण अक्षरात लिहावे, असे आहेत. जे लोक साखर उद्योगातील होते. ते लोक सत्तेवर असताना निर्णय घेऊ शकले नाहीत. मोदीजी आल्यानंतर मोदींना साखरेतंल काय समजतं, अशी टीका करण्यात आली पण जे-जे निर्णय त्यांनी घेतले नाहीत. ते निर्यण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.