रामभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय,पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार 15 विशेष रेल्वे गाड्या

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर नवीन मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी सुरु होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी आता पुण्यातून अयोध्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. येत्या 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या अयोध्येसाठी पुण्यातून सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांची अयोध्या वारी सोपी होणार आहे.

भारतीय रेल्वेने प्रभू रामभक्तांसाठी 200 विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. योध्येला जाण्यासाठी भाविकांनी विशेष गाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार 30 जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी 15 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असणार आहेत. पुणे-अयोध्या-पुणे रेल्वे सेवेसाठी तीन रॅकचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अयोध्येहून पुण्याला जाण्यासाठी 15 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. एका गाडीतून सुमारे दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकतील. लवकरच या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्यातून नेमक्या कोणत्या गाड्या धावणार याची माहिती येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.

या गाड्यांचे बुकींग लवकरच सुरू होणार आहे. या गाड्यांना मिळणार प्रतिसाद पाहून पुढे विशेष गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. कोल्हापूरहून देखील अयोध्यासाठी विशेष गाडी सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण, कोल्हापूर येथून अयोध्यासाठी गाडी सुरू झाल्यास पुण्यातील प्रवाशांना आणखी एक गाडी मिळणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाचं काम पूर्ण झालेलं असून त्यामध्ये 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठपणा सोहळा पार पडणार आहे. यानंतर अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्रातील भाविकांसाठी रेल्वेकडून पुढील महिनाभर विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.