देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ ने त्यांची नवीन योजना, एलआयसी जीवन उत्सव बाबत माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत एलआयसीने हमी परतावा आणि खात्रीशीर उत्पन्नाचे आश्वासन दिली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितलं की, जीवन उत्सव योजना ही ‘नॉन-लिंक्ड’, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे. एलआयसीचा जीवन उत्सव प्लॅन क्रमांक 871 आहे, जो आजीवन गॅरंटीड परताव्यासह येतो.
एलआयसी जीवन धारा-2 ही एलआयसीची वार्षिकी योजना आहे. ही योजना खरेदी करण्यासाठी तुमचं किमान वय 20 वर्षे असणे गरजेचं आहे, तर कमाल वयोमर्यादा वार्षिकी पर्यायानुसार ठरवली जाईल. योजना खरेदी करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 80 वर्षे, 70 वर्षे आणि 65 वर्षे स्थगिती कालावधी आहे. सोमवारपासून हा प्लॅन खरेदी करता येणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, हा प्लॅन ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारे खरेदी करता येईल.या योजनेतील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ॲन्युइटी हमी. एलआयसीने रिलीझमध्ये म्हटले आहे की प्लॅनमध्ये 11 ॲन्युइटी पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या दिवसापासून ॲन्युइटीची हमी दिली जाते आणि वाढत्या वयानुसार उच्च वार्षिकी दराची तरतूदही या विमा योजनेमध्ये करण्यात आली आहे.
एलआयसीच्या या योजनेत, पॉलिसीच्या पुढे ढकलण्याच्या कालावधीत विमा संरक्षण उपलब्ध असताना टॉप-अप ॲन्युइटीद्वारे ॲन्युइटी वाढवण्याचा पर्याय मिळतो. पॉलिसीधारक पॉलिसी लागू असताना स्थगिती कालावधी दरम्यान कधीही एक प्रीमियम म्हणून अतिरिक्त प्रीमियम भरून टॉप-अॅन्युइटीची निवड करू शकतो.आयुर्विमा महामंडळाच्या तरलतेचा पर्यायही उपलब्ध असले. उदाहरणार्थ पॉलिसीधारक वार्षिकी पेमेंटमधील कमतरता भरून काढण्यासाठी एकरकमी पेमेंट पर्यायाची निवड करू शकतो. या पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारकाला स्थगिती कालावधी दरम्यान आणि नंतर कर्जाची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये अनेक ॲन्युइटी पर्याय उपलब्ध आहेत, ज्यापैकी तीन मुख्य पर्याय आहेत.
या योजनेची किमान विमा रक्कम 5 लाख रुपये असणार आहे. तर पॉलिसी सुरू करताना पॉलिसीधारकाचे किमान वय 18 आणि प्रीमियम पूर्ण होण्याच्या वेळीचे वय कमाल 75 वर्षे असावे. या योजनेअंतर्गत, एलआयसी पॉलिसीधारकाला 5.5 टक्के दराने वार्षिक व्याज देखील देणार आहे. परंतु, पॉलिसीधारकाला या योजनेअंतर्गत मॅच्युरिटीचा लाभ मिळणार नाही. या प्लॅनमध्ये अनेक ॲन्युइटी पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी तीन मुख्य पर्याय आहेत. पहिला पर्याय नियमित प्रीमियमचा आहे, ज्यामध्ये स्थगिती कालावधी 5 वर्षे ते 15 वर्षे आहे. दुसरा पर्याय सिंगल प्रीमियमचा आहे, ज्यामध्ये स्थगिती कालावधी 1 वर्ष ते 15 वर्षांपर्यंत आहे. तिसरा पर्याय म्हणजे संयुक्त जीवन वार्षिकी आणि एकल जीवन वार्षिकी.
