अयोध्येतील राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळा अवघ्या जगाने आपल्या डोळ्यांनी बघितला. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होताच देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. या सोहळ्याकडे देशासह जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले होते. या सोहळा संपन्न होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे..अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनेक वर्षांपासून वाट पाहिली जात होती. या सोहळ्यासाठी मोठअया प्रमाणात तयारी देखील करण्यात आली. देश-विदेशातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आले होते. अखेर आज हा सोहळा पार पडला आहे.
अयोध्येतील राममंदिर सोहळ्यानंतर २३ जानेवारीपासून सर्वसामान्य जनतेसाठी रामलल्लाचे दर्शन खुले होईल. त्यासाठी मंदिर न्यासाने २३ जानेवारी ते २५ मार्चपर्यंत दर्शन नियोजन केले असून, रोज एक लाख रामभक्त अयोध्येतील दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने त्रिस्तरीय व्यवस्थापन करण्यात आले आहे.अयोध्येत भक्तांचा महासागर उसळला आहे. अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ,रणदीप हुड्डा,सचिन तेंडुलकर यांची उपस्थिती होती.
रामललाची ही मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी शालिग्राम खडकापासून बनवली आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे. धर्मग्रंथ आणि धार्मिक ग्रंथांमध्ये शालिग्राम पाषाण हे भगवान विष्णूचे रूप मानले गेले आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले गेले आहेत. शालिग्राम खडक हजारो वर्षे जुना आहे. हे पाणी प्रतिरोधक आहे. चंदन लावल्याने मूर्तीच्या चकाकीवर परिणाम होत नाही.
