जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मराठा समाजाचं अभिनंदन

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक करुन आपलं मनोगत व्यक्त केलं. मलाही गोरगरीब समाजाचं दुख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणविषयक विजयी सभेत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आंदोलक नेते मनोज जरांगे यांच्या कार्याचं कौतुक केलं तसेच मराठा समाजानं शांततेनं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं त्याबद्दल आभार मानले. तसेच आपण दिलेला शब्द पाळतो, जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली, मराठा समाजाचं यावेळी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाचं अभिनंदन केलं,मराठा समाजाने शांततेत आणि संयमाने आंदोलन केल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी समाजाचं कौतुक केलं.

मंत्रिमंडळ, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून मराठा आरक्षण देण्यात आले आहे. सरकार या आरक्षणाबाबत गंभीर असल्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. जो अध्यादेश काढला, त्याची जबाबदारी सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. आरक्षणाबाबत आपण समाजाला जो शब्द दिला होता. तो आज पूर्ण केल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे ते म्हणाले. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी उभा ठाकला. त्यांनी शांतते मोर्चा काढाला. आंदोलन केले. इतर कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, अशी कौतुकाची थाप सुद्धा त्यांनी दिली.

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच ते म्हणाले, ‘एक मराठा लाख मराठा’ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमीपणे या ठिकाणी आंदोलन केलं. राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो असंही मुख्यमंत्रीय एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.