पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे.
जे तरूण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही खरच खुशखबर आहे. राज्यातील 100 टक्के पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक या विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे. तब्बल 17471 जागा भरल्या जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी या पोलीसभरतीवरून राज्यात वाद निर्माण झाला होता. पोलिसांची कंत्राटी भरतीचा निर्णय शिंदे सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र त्यावरून वाद झाला होता. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.
2018 च्या पोलीस भरतीत मोठ्याा संख्येने उच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज भरले होतो. यात अगदी इंजिनिअर्स,एमबीए,एमए,एमएससी,एमकाॅम अशी उच्च पदवी घेतलेल्यांची संख्या अधिक होती. 1449 पेलिस कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलिसांची भरती पार पडली. ज्यासाठी तब्बल 109 एमबीए धारकांनी अर्ज केला तर, 1 हजार 978 एमए, 543 एमकॉम, 423 इंजिनिअर्स, 63 एमएसडब्ल्यू, 30 एमसीए अशा पोस्ट ग्रॅज्यूएट्ससहीत हजारो पदवीधारकांनी अर्ज केले होतो. यामधुन 446 पदवीधारक, 27 उच्च पदवीधारक आणि 986 एचएससी धारकांची निवड झाली होती.
