प्रकाश आंबेडकरांची पुन्हा पलटी, काँग्रेससोबत अद्याप नसल्याचे केले स्पष्ट

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होऊ नये आम्ही अद्याप आघाडीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आंबेडकर म्हणाले, आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. पुढील आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होणार, असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु आहे.

मात्र,वंचित आघाडी अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही, असं स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. पुढील आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होणार, असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, जे मुद्दे मी बैठकीत ठेवले होते, त्या मुद्द्यांच्या संदर्भात तिन्ही पक्ष अंतर्गत चर्चा करत आहेत. या मुद्द्यांमध्ये आणखी काही मुद्दे सामील करायचे असल्यास ते केले जातील. त्यानंतर एक ड्राफ्ट तयार होईल. इतर मुद्द्यांवरील चर्चा ही सुरू राहील. महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये, याची दक्षता घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे जागावाटप हे दुसऱ्या टप्प्यात ठरवलं जाईल. त्याआधी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा होणार आहे. इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही. आमचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा भाग होण्याचा विषय नाही.

25 जानेवारी रोजी महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली होती .या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना बैठकीचे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाना पटोले यांची केलेली खरडपट्टी चर्चेचा विषय ठरला. इतकेच नव्हे तर प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रानंतर प्रदेशकाँग्रेसमध्ये नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांचे अधिकार कमी झाल्याचे समोर आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात आंबेडकर यांनी खोचक शब्दात भाष्य करताना म्हणाले होते की, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार 23 जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात.

तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत, असे ते म्हणाले होते.