लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे अशी माहिती आता समोर आली आहे. सरकारविरोधात असंतोष निर्माण केला जाण्यासाठी हे केले जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि गोंदिया या पाच शहरांमध्ये नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्याचा कट रचला आहे. नागपूरचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
सीपीआय माओवादी जे आहेत त्यांचाच एक भाग आहे युनायटेड फ्रंट. युनायटेड फ्रंट हे शेतकरी, विद्यार्थी यांच्यामार्फत शासनाविरोधात रोष निर्माण करणं हे या युनायटेड फ्रंटचं काम आहे. ज्यांना आपण शहरी माओवादी म्हणतो. त्यांची गोपनीय माहिती मिळाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, गोंदिया, नागपूर या शहरांमध्ये त्यांनी त्यांचं नेटवर्क तयार केलं आहे. या ठिकाणी शहरी नक्षलवाद पेरणं सुरु आहे. शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या ५४ संस्था आमच्या रडारवर आहेत.” ही माहिती नक्षलवाद विरोधी मोहिमेचे प्रमुख संदीप पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवादी काही शहरात हिंसक आंदोलने करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सीपीआय मॅावोइस्ट या प्रतिबंध असलेल्या संघटनेची युनायटेड फ्रंट शहरांमध्ये हिंसक आंदोलने घडवणार आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून शासनाविरुद्ध रोष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुले नक्षल चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहे. पुण्यात एटीएसच्या ताब्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवलं होते. तसंच शहरी नक्षलवादी तरुणांची भरती करुन जंगलात पाठवत आहेत.
सीपीआय माओइस्ट या बंदी घातलेल्या संघटनेची युनायटेड फ्रंट ही शाखा राज्यातल्या पाच शहरांमध्ये आंदोलने आणि घातपात घडवणार असल्याचे समजते आहे. पुण्यातील झोपडपट्टीतील काही मुले नक्षली चळवळीसाठी जंगलात पाठवली जात आहेत. पुण्यात एटीएसच्या ताब्यात असलेला संतोष सेलार याला नक्षलवाद्यांनी जंगलात पाठवले होते. तसेच शहरी नक्षलवादी तरुणांची भरती करुन जंगलात पाठवत आहेत. अशी माहिती संदीप पाटील यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्त वाहिनीशी बोलताना दिली.
