गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाने नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने भल्या पहाटे नाशिकमध्ये दाखल होऊन चार जणांच्या दहा ते पंधरा ठिकाणच्या कार्यालयांमध्ये धडक कारवाई केली होती. त्याच आता पुन्हा बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यावधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले. तब्बल 8 ठिकणाहून ही छापेमारी झाली असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात ही छापामारी करण्यात आली होती. सलग चार ते पाच दिवस 8 हून अधिक ठिकाणी ही छापामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे. 850 कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचचा आयकर विभागाला संशय आहे. या छाप्यात 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले असल्याची माहिती आहे.
दरम्यान याप्रकरणी आयकर विभागाच्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे तसेच पेन ड्राईव्ह तपासणी साठी जप्त करण्यात आले आहेत.यात काही कंत्राटदार कर्मचारी यांच्या घरी तर काहींच्या कार मधून रोक्कड जप्त करण्यात आली आहे.दरम्यान आयकर विभागाच्या पुढील तपासात आणखी काही घबाड बाहेर येते? याकडे सर्व नाशिक येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
काही बांधकाम व्यावसायिकांकडे चिठ्ठ्या सापडल्या असून या चिठ्ठ्यांवर इंग्रजी वर्णमाला अक्षरांच्या आधारे तपासण्यात करण्यात आली. यात काही लोकप्रतिनिधीची नावे समोर आली होती. संबंधित तरुणीची पाच ते सहा तास चौकशी केली असता. काही बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठी माया सापडल्याचीही चर्चा होती. या धडसत्रानंतर नाशिकमधून अडीचशे ते तीनशे कोटींचा कर भरला गेल्याची चर्चा होती. त्यानंतर आता आयकर विभागाने महापालिका तसेच शासनाच्या बांधकाम विभागाशी संबंधित कंत्राटदार तसेच बिल्डरांवर बुधवारी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे.
