प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरीला अटक; गुजरात एटीएसकडून अटक

गुजरात एटीएसने मुस्लीम धर्मगुरु तसंच इस्लामचा अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरीला अटक केली आहे. त्यांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात गुजरातच्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात पोलिसांनी काही वेळापूर्वीच मुफ्ती सलमान अजहरींना अटक केली. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आहे. हे सगळे मुफ्ती सलमान अजहरींचे समर्थक आहेत. त्यांची पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरु आहे.

मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसकडून काल दुपारी बाराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना अजूनही घाटकोपर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. यावेळी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको करून घोषणाबाजी करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी अफाट अशी गर्दी केली आहे.

मौलाना मुफ्ती सलमान अझहरीने गुजरात मधल्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केले होते. त्यात त्याने सध्या कुत्र्यांची वेळ आहे. पण करबलाचे आखरी मैदान बाकी आहे. आपली वेळ येईलच. त्यावेळी त्यांना धडा शिकवू, अशी चिथावणीखोर भाषा वापरली होती. त्या भाषणामुळेच मौलाना मुफ्ती सलमान अझहरी आणि त्याच्या साथीदारांवर गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला गुजरात एटीएसने काल सायंकाळी घाटकोपर मध्ये येऊन अटक केली. हेट स्पीच प्रकरणी मुफ्ती सलमान अझहरीवर कलम 153 ए, 505, 188, 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी जुनागड पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.

मुफ्ती सलमान अजहरी यांनी गुजरातमधल्या जुनागड येथे ३१ जानेवारी रोजी प्रक्षोभक भाषण केलं असा त्याच्यावर आरोप आहे. या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या व्हिडीओची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी मलिक आणि हबीब या आयोजकांना अटक केली आहे. तर आता मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणाहून अजहरला अटक करण्यात आली आहे.