वैफल्यग्रस्त राहूल गांधींची भाषा घसरली, तेली समाजाचा केला अपमान

वैफल्यग्रस्ततेतून कॉग्रेसचे खासदार राहूल गांधींची भाषा घसरली आहे. त्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जात काढली आहे. मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरातमधील तेली जातीत झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे संपूर्ण देशातील तेली समाजाचा अपमान झाला आहे.

नरेंद्र मोदी हे कास्ट सेन्सेक्सला विरोध करत आहेत. कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे, असे उद्गार राहुल गांधी यांनी ओडिशातील सभेत काढले. राहुल गांधींचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे, असा घणाघात भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.

देशमुख म्हणाले की, यूपीए -2 च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही. धनगरांच्या आणि गोवारी जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल काँग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला आहे.

ते म्हणाले की, राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिकप्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात राहीली आहे. पंडित नेहरू यांनी सन 1953-54 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सिफारशींचा विरोध केला होता.इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला होता. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता. डॉ. देशमुख म्हणाले की, राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत, कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे.

एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस तेली समाजाला ओबीसीपासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्येसुध्दा फूट पाडत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. अनेक राज्यांत काँग्रेस ने ओबीसीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना हे आरक्षण देण्याचे प्रकार केलेले आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा काँग्रेसने कधीही दिलेला नाही.