उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्द पाहता वाटतं, की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं माझं ठाम मत झालं आहे. मी त्यांच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. फक्त ईश्वराकडे इतकीच प्रार्थना करेन, की ‘गेट वेल सून!’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले. फडणवीस हे मनोरुग्ण गृहमंत्री म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली होता.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरुन सरकारवर होणारे आरोप फेटाळून लावले. राज्यात गेल्या काही काळात ज्या गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, त्या निश्चितच गंभीर आहेत. पण या सर्व घटना वैयक्तिक वैमन्यसातून घडल्या आहेत. त्यामुळे याचा थेट कायदा व सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य आहे. या गुन्हेगारी घटना आपापसातील हेवेदावे, भांडणांमुळे घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात एका पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असून याची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विजय वडेट्टीवारांना फार काही माहिती नसतं, ते अशा सनसनाटी गोष्टी बोलत असतता. कुठल्याही गोष्टीची योग्य प्रकारे होईलच. पण अलिकडच्या काळात गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण सुरु केली आहे. जल हेच जीवन आहे, ज्या-ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळेस जलसंधारणाची महती काय हे लक्षात येतं. जेव्हापासून जलयुक्त शिवारची काम केलीत, तेव्हापासून दुष्काळाच्या काळात लोकांना काही प्रमाणात दिलासा देऊ शकलोय. हे जलरथ जलसाक्षरता करणार आहेत. केंद्राच्या, राज्याच्या योजना जलयुक्त शिवार 2 च्या योजना या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.