भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज साजरी करावी या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार हल्ला केला आहे.
चाकणकर म्हणाल्या, भाऊबीजेचे गिफ्ट म्हणून अजितदादांकडून १५ वर्षांपासून मिळत आलेली खासदारकी जाण्याची लक्षणे दिसताच, भाऊबीजेच्या ऐवजी बहीणबीज करण्याची सुपीक आयडिया काळजीवाहू ताईला सुचली आहे.
अर्थात भाऊबीज आणि भाऊबीजेमागे असलेली आपली संस्कृती ही मांसाहार करून मंदिरात पाया पडणाऱ्यांना समजली असेल का ही शंकाच आहे.सरकार सत्तेत आल्यापासून आश्वासनांच्या नुसत्याच गप्पा मारतंय, पण आशा भगिनींच्या हाती काहीच लागलेलं नाही. जे सरकार या भगिनींसाठी काही करत नाही, असं हे सरकार निरुपयोगी भावासारखंच आहे. नुसत्या आश्वासनांनी सत्ता मिळत नाही, तर जनतेचे प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. यंदा भाऊबीज नाही, बहिणीबीज साजरी करू, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्या चाणकरांनी सडकून टीका केली आहे.
