चंदीगड महापौर निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप होत असतानाच चंडीगड महानगरपालिकेमध्ये भाजपाने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. चंडीगड महानगरपालिकेतील आपचे 3 नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले आहेत. नेहा मुसावट, गुरचरण काला आणि पूनम देवी यांनी चंडीगडमधील भाजपाचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या तिघांनीही भाजपात प्रवेश केला.
अनेक दिवस लांबलेल्या चंदीगड महापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र आल्याने त्यांचा महापौर निवडून येईल, अशी स्पष्ट स्थिती होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांने आप-काँग्रेसची आठ मते बाद ठरवली. त्यामुळे भाजपला बहुमत मिळून भाजपचे मनोज सोनकर महापौर झाले. सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्वीच दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भाजपने नंबर गेम जुळवून आणण्यासाठी आम आदमी पक्षाला मोठा झटका दिला आहे. एकीकडे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे सोनकरांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे.
तीन आप नगरसेवकांच्या आगमनाने,भाजप नगरसेवकांची संख्या आता 17 झाली आहे ,तर त्यांच्याकडे व खासदार भाजपकडे खासदार किरण खेर यांचे 1 मत आहे ल. याशिवाय नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव नागरसेवकानेही भाजपला पाठिंबा दिला होता. म्हणजे भाजपकडे आता 19 माटे आहेत आणि तो संख्या बळाच्या बाबतीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
तीन नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसकच्या मतांची संख्या 20 वरून 17 वर आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या 7 आणि आपच्या 10 नगरसेवकांचा समावेश आहे. चंदीगड महापालिकेत ऐकून 35 नगरसेवक आहेत, तर एका खासदाराच्या मतात 36 मतांची भर पडते.आशा प्रकारे बहुमताचा आकडा 19 वर येतो, तर भाजपला 20 मते मिळाली आहेत.
